नाशिक : वेश्याव्यवसायासाठी बांगलादेशमधून मानवी तस्करी, तिघांना अटक
वेश्याव्यवसायासाठी बांगलादेश होणाऱ्या मानवी तस्करीचा एबीपी माझाने पर्दाफाश केल्यानंतर नाशिक पोलिसांना जाग आली आहे. त्यांनी पहाटे चार वाजेपर्यंत कारवाई करुन तीन जणांना अटक केली आहे. तर सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
सोनू देशमुख आणि विशाल गंगावणे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. त्यांच्यावर पीटा आणि इतर कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुंटणखाना चालवणाऱ्या नानी गंगावणेलाही स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे.