नाशिक : पैसे पडल्याची बतावणी करुन 28 लाखांची रोकड लंपास
Continues below advertisement
पैसे पडल्याचं खोटं सांगत २८ लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडलाय. शरणपूर रोडवरील एका ज्वेलर्सचा कर्मचारी दुकानातील रोकड भरण्यासाठी बँकेत आला होता. त्यावेळी त्या कर्मचाऱ्याला तुमच्या नोटा खाली पडल्याचे काही संशयितांनी सांगितलं. संबंधित कर्मचाऱ्याचं लक्ष विचलीत होताच आरोपीने पैशांची बॅग घेत धुम ठोकली. दरम्य़ान पैशाची बॅग घेऊन आरोपी जात असतानाची दृष्य सीसीटीव्हीत कैद झालीये.
Continues below advertisement