VIDEO | छत्रपती शिवरायांचा तब्बल 13 फुटी जिरेटोप, विक्रमाची वंडर बुकमध्ये नोंद | नाशिक | एबीपी माझा
Continues below advertisement
नाशिकच्या छत्रपती सेनेतर्फे कालिका मंदिराच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्त १३ फूट उंच असा जिरेटोप बवनण्यात आला. विशेष म्हणजे या जिरेटोपाची वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. संध्याकाळी ढोलताशाच्या गजरात या जिरेटोपाचे अनावरण करण्यात आलं. हा जिरेटोप बनविण्यासाठी १५ दिवस लागले. यासाठी १४० किलो रिक्रोन कापूस, १२० मीटर कपडा, ५० बांबू आणि ७५ चटई वापरण्यात आल्या. हा आगळा वेगळा उपक्रम बघण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. विविध जातींच्या लोकांना एका छताखाली आणून शिवरायांचे विचार जगापर्यंत पोहोचवण्याचा छत्रपती सेनेचा या उपक्रमामागील उद्देश आहे.
Continues below advertisement