एलियन्स की माणूस, नासाने शोध लावला, 20 ग्रह राहण्यासाठी योग्य!
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने ब्रम्हांडात पृथ्वीसारखे राहण्यायोग्य तब्बल 20 ग्रह असल्याचा शोध लावला आहे. नासाच्या केपलर दुर्बिनीद्वारे या ग्रहांचा शोध घेण्यात आला आहे.
महत्त्वाचं म्हणजे या 20 ग्रहावर एलियन्सचा अधिवास असू शकतो किंवा माणसाला तिथे राहण्याजोगी स्थिती आहे, असा शोध नासाने दुर्बिणीच्या साहाय्याने लावला आहे. पृथ्वी किंवा धरतीप्रमाणे दुसरं व्हर्जन नासाने शोधलं आहे.