गुजरात: नरोदा पाटिया दंगलीप्रकरणी माया कोडनानी निर्दोष, बाबू बजरंगीला जन्मठेप
नरोदा पाटिया दंगलीत गुजरात उच्च न्यायालयने माजी मंत्री माया कोडनानी यांना निर्दोष ठरवत सुटका केली. तर बजरंग दलाचे माजी नेते बाबू बजरंगीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. अहमदाबादच्या विशेष एसआयटी कोर्टाने बाबू बजरंगीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.