VIDEO | कॉंग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ढकोसपत्र- नरेंद्र मोदी | अरुणाचल प्रदेश | एबीपी माझा

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील देशद्रोही कलम मागे घेण्याच्या आश्वासनावर पंतप्रधान मोदींनी सडकून टीका केली.  काँग्रेस देशासोबत आहे की देशद्रोहींसोबत असा सवाल मोदींनी केला. अरुणाचल प्रदेशच्या पासीघाटमधील सभेत मोदी बोलत होते.  काँग्रेसच्या  जाहीरनाम्यातली सर्व आश्वासनं फसवी आहेत. त्यांनी जाहीरनामा नव्हे तर ‘ढकोसलापत्र’ म्हटले पाहिजे, असंही मोदी म्हणाले. ही निवडणूक संकल्प आणि कट, भ्रष्टाचार आणि विश्वास यांच्यातील निवडणूक असल्याचंही मोदींनी म्हटलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola