नारायण राणे भाजपची खासदारकीची ऑफर मान्य करतील?
Continues below advertisement
नारायण राणे यांना भाजपकडून राज्यात नव्हे तर दिल्लीत पाठवण्याची तयारी सुरु झाली आहे. काल (बुधवार) रात्री भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या ११ अकबर रोड या दिल्लीतल्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यात जवळपास तासभर बैठक झाली.
या बैठकीला नितेश राणे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचीही उपस्थिती होती. येत्या २३ मार्चला महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभेतल्या संख्याबळानुसार भाजपला ३ उमेदवार राज्यसभेवर पाठवता येणार आहेत. त्यापैकी एक जागा राणेंना देऊन राणेंसारखं स्फोटक मिसाईल हे राज्याऐवजी दिल्लीतच पाठवण्याचा भाजपमध्ये प्रयत्न सुरु आहे.