VIDEO | महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडूनच राणे निवडणूक लढवणार! | मुंबई | एबीपी माझा
काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चेचं खुद्द खासदार नारायण राणेंनीच खंडन केलं आहे. तसंच आगामी निवडणुका या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून लढवणार असल्याची माहिती राणेंनी दिली आहे. आज नारायण राणेंनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र या भेटीत जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, केवळ निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचं राणे म्हणाले.