नंदुरबार | शहादा तालुक्यात 375 केळीची झाडं कापून फेकली, अज्ञातांविरोधात गुन्ह्याची नोंद
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान झालंय... जावदे गावातल्या 375 केळीची उभी झाडं अज्ञात लोकांनी कापून फेकलीत... जगतसिंग चांद्रसिंग गिरासे या शेतकऱ्याच्या शेतातली झाडं कापून फेकलीत... यामुळे शेतकऱ्याचं जवळपास 2 लाखांचं नुकसान झालंय... मागील सहा महिन्यातील ही केळीची झाडं कापून फेकण्याची सातवी घटना आहेत... या घटनेवरुन शहादा पोलिसात अज्ञातांविरोधा त गुन्हा नोंदवण्यात आलाय..