मुंबई | वांद्र्यात पैशांच्या व्यवहारातून महिलेकडून महिलेची गळा चिरुन हत्या
मुंबईतल्या वांद्र्यात महिलेनंच महिलेचा गळा कापून हत्या केली. याप्रकरणी आरोपी महिलेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून महिलेची हत्या झाली. अर्चना नामक महिलेची हत्या रिलायबल कन्स्ट्रक्शनच्या रिकाम्या जागेतील शेडमध्ये काल करण्यात आली. दुपारी अडीच ते सव्वा सहादरम्यान ही घटना घडली.