नंदुरबार : ऐन उन्हाळ्यात शहादा तालुक्यात नदीला पूर
Continues below advertisement
भर उन्हाळ्यात नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं सुसरी नदीला पूर आला आहे. काल दुपारी दोनपर्यंत नंदुरबारमध्ये उन्हाच्या झळा बसत होत्या. मात्र चारनंतर अक्कलकुवा आणि धाडगावमध्ये अचानक पावसाच्या सरी बरसू लागल्या. यामुळे ब्राम्हणपुरीमधल्या सुसरी नदीला अक्षरश पूर आला. तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील केळी, पपई, गहू, हरभरे या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मात्र पाण्याची टंचाई असणाऱ्या भागात पाऊस झाल्याने पाण्याची समस्या सुटली आहे.
Continues below advertisement