नंदुरबार | नवापुर तालुक्यात 5 जणांचा मृत्यू, सहाजण बेपत्ता
नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यात पावसाने 5 जणांचा मृत्यू झालाय. तर सहाजण बेपत्ता आहेत. सध्या परिसरातील तब्बल 300 च्यावर घरांची पडझड झाली आहे. तसेच 60 जनावरे देखील दगावली आहेत. नवापुर तालुक्यात शुक्रवारी पहाटे 140 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. दुसरीकडे विसरवाडी परिसरातील वाडी शेवाडी प्रकल्पाला भगदाड पडल्याने सरपणी नदीला पुर आला आहे.