नंदुरबार : आरोग्य अधिकारी कर्मचारी महासंघाचं कामबंद आंदोलन
Continues below advertisement
नंदुरबारमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी महासंघानं कामबंद आंदोलन सुरू केलंय. कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येतंय. 900 कंत्राटी कर्मचारी यात सहभागी झाले आहेत. आंदोलनामुळे नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे कामकाज कोलमडलंय. आंदोलन असंच चालू राहिलं तर दुर्गम भागातील आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता आहे
Continues below advertisement