नंदुरबार : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा, दोन नगरसेवकांना मारहाण

Continues below advertisement
नंदुरबार पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी झालेली पाहायला मिळाली. विषय मंजुरीवरुन भाजप आणि  काँग्रेस नगरसेवकांमध्ये वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं.  यात दोन भाजप नगरसेवकांना मारहाण करण्यात आली आहे. तर एका भाजप नगरसेविकाचा पती गंभीर जखमी झाला आहे. या राड्यावरुन नंदुरबार पालिका परिसरात तणावाचं वातावरण पाहायलं मिळालं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram