नंदुरबार : राज्यातील अनेक भाजप नेते काँग्रेसच्या संपर्कात, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. राज्यातले भाजपचे अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचा त्यांनी दावा केलाय.. भाजपाचा राज्यातील प्रभाव कमी होत चाललाय त्यामुळे आपण भाजपात जाऊन चूक केल्याची भावना अनेक नेते व्यक्त करत असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत. काही दिवसांपूर्वी नाना पटोलेंनी भाजपला रामराम ठोकला आणि काँग्रेसशी लगट केली.. त्यांनंतर भाजपच्या आशीष देशमुखांची खदखदही वारंवार समोर येतेय.. तेव्हा आता पृथ्वीराज चव्हाण कुणा कुणाबद्दल बोलताहेत.. याची चर्चा नक्कीच रंगेल.