
नंदुरबार : दहिंदुले गावात आमीर खान आणि रणबीर कपूरचे दुष्काळाशी दोन हात
Continues below advertisement
नंदुरबारच्या दहिंदुले आणि उमरेद या गावात अभिनेता आमीर खान , रणबीर कपूर आणि किरण राव यांनी श्रमदान केलं. आमीरच्या गावातील आगमनामुळे दहिंदुले ग्रामस्थांचा उत्साह वाढला होता. सकाळी साडेआठच्या सुमारास आमीर श्रमदानासाठी दाखल झाला. गावातील तरुणांनी घोषणा देत आमीरचं स्वागत केलं. रणबीर कपूरनंही हातात टीकाव आणि कुदळ घेत श्रमदानाचं काम चोख बजावलं. गावात झालेल्या कामांची पाहणी करत ग्रामस्थांचं कौतुक करायलाही आमीर विसरला नाही. यावेळी श्रमदान करणाऱ्या गावकऱ्यांची किरण राव यांनी आस्थेने चौकशी केली.
Continues below advertisement