नांदेड: काँग्रेसच्या शिबिरात चिंतन कमी आणि झोपाच जास्त
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी नांदेडमध्ये काँग्रेसतर्फे शिबीर घेण्यात आलं. पण या शिबीरातल्या निम्म्यापेक्षा जास्त खुर्च्या रिक्याम्याच होत्या. शिवाय उपस्थितांपैकी बहुतांश कार्यकर्ते हे मोबाईलवर फेसबुक किंवा ल्युडो गेम खेळण्यातच गुंग होते. इतकच नाही तर बऱ्याच कार्यकर्त्यांनी अक्षरशः झोपाही काढल्या. तापमान जास्त असल्यामुळे कार्यकर्त्यांसाठी कूलर, थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली पण कार्यकर्त्यांनी चिंतन करायचं सोडून डुलक्याचं काढल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे या शिबीराला सचिन पायलट देखील उपस्थित होते.