नांदेड : पेन्सिलच्या टोकाएवढा आकार, 190 मिलीग्रॅम वजन, जगातला पहिला उडता रोबो

Continues below advertisement
जगातल्या पहिल्या सर्वात लहान, वायरलेस उडणाऱ्या रोबोचा शोध मूळचे नांदेडचे असलेले संशोधक योगेश चुकेवाड आणि त्यांच्या टीमने लावला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये हा शोध लावण्यात आला. योगेश चुकेवाड अमेरिकेत संशोधक म्हणून काम करतात. या रोबोचा आकार पेन्सिलच्या टोकाएवढा असून वजन 190 मिलिग्राम आहे. अमेरिकेतल्या किरो 7 या वाहिनीवरुन या उडत्या रोबोचं प्रक्षेपण करण्यात आलं. ब्रिस्बेनमधल्या कॉन्फरसमध्ये योगेश चुकेवाड हा शोध सादर करणार आहेत. योगेश चुकेवाड हे ज्येष्ठ बालसाहित्यिक माधव चुकेवाड यांचे चिरंजीव आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram