नांदेड : पोलिसांच्या मारहाणीत योगेश जाधवचा मृत्यू, कुटुबियांचा आरोप, सीबीआय चौकशीची मागणी
Continues below advertisement
कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर उसळलेल्या हिंसाचारात आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा नांदेडमधील एका कुटुंबियांने केलाय. महाराष्ट्र बंदच्या दिवशी हदगावमधील 15 वर्षीय योगेश जाधव हा विद्यार्थी परिक्षासंदर्भात माहिती विचारण्यासाठी भावासाबेत शाळेत निघाला होता. त्यादरम्यान आष्टी चौकात रास्तारोको सुरु होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. याच लाठीमारात योगेशचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केलाय, तर योगेशचा मृत्यू लाठीमारात झाला नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी जाधव कुटुंबीयांनी केली आहे.....
Continues below advertisement