नांदेड : पोलिस भरतीचा जवळपास 17 जिल्ह्यांमध्ये घोटाळा
Continues below advertisement
नांदेडच्या पोलिस भरती घोटाळ्याची पाळंमुळं फार खोलवरी रुजल्याची माहिती आता समोर येते आहे. जवळपास 17 जिल्ह्यांमध्ये हा घोटाळा झाल्याचं कळतं आहे. या घोटाळ्यात आतापर्यंत 15 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर मुख्य आरोपी प्रवीण भटकर आणि त्याचे 5 साथीदार फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत.
Continues below advertisement