नांदेड : निलंगेकरांना सूट, मग आम्हाला का नाही? शेतकऱ्यांचा सवाल
Continues below advertisement
शेतकऱ्यांना कर्जाच्या रुपया-रुपयासाठी तगादा लावणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या राष्ट्रीयकृत बँका मोठे उद्योगपती आणि राजकारण्यांसमोर कसे झुकतात, याचे उदाहरण महाराष्ट्रात समोर आले आहे. राज्याचे कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या मद्यार्क निर्मिती कारखान्यासाठी महाराष्ट्र बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या दोन बँकेकडून कर्ज घेतले होते. या बँकांनी निलंगेकरांवर मेहरबान होत कर्जाच्या व्याज आणि मुद्दलातले 51 कोटी 40 लाख रुपये माफ केले आहेत.
Continues below advertisement