उस्मानाबाद : मेडिकल प्रवेश प्रक्रियेत मराठवाड्यावर अन्याय
Continues below advertisement
मेडिकलच्या जागांसाठी उर्वरित महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा असे तीन विभाग करण्यात आले आहेत. या विभागात उपलब्ध असलेल्या एकूण जागांपैकी 70 टक्के जागा त्या विभागांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. उर्वरित 30 टक्के जागा केंद्रीय पद्धतीनं भरल्या जातात. त्यामुळे मराठवाड्याच्या वाट्याला उर्वरित विभागापेक्षा कमी जागा येत आहेत. त्यामुळे ही पद्धत बंद करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. यासंदर्भात सर्वोच न्यायालयाच्या निर्देशानुसार उच्च न्यालायच्या औरंगाबाद खंडपीठात 2 वर्षांपासून याचिका प्रलंबित आहे. या याचिकेत 26 एप्रिल 2018 पर्यंत राज्य सरकारनं वेळ मागितला आहे.
Continues below advertisement