नांदेड : मोदी, गडकरी, फडणवीस आल्यानं अनेकांची दुकानं बंद झाली : नितीन गडकरी
मोदी, गडकरी आणि फडणवीस सत्तेत आल्यानंतर अनेकांची दुकानं बंद झाली आहेत. आणि त्यामुळेच काही लोक जातीय तणाव निर्माण करत असल्याचा घणाघाती आरोप नितीन गडकरी यांनी केला आहे. ते आज नांदेडमध्ये बोलत होते. गडकरी यांच्या हस्ते महामार्गाचं भूमीपूजन करण्यात आलं.