नांदेड : एमपीएससी घोटाळ्यातील आरोपींकडे कोट्यवधींचं घबाड
Continues below advertisement
बनावट उमेदवार बसून एमपीएससी परीक्षेत सरकारी पदं लाटणाऱ्या घोटाळ्यात नवनवीन खुलासे होत आहेत. हा घोटाळा मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यासाऱखा मोठा घोटाळा असू शकतो.
धक्कादायक गोष्ट म्हणजे 2007 ते 2016 अशा दहा वर्षांच्या काळात हा घोटाळा झालाय. विशेष म्हणजे घोटाळ्यातील मुख्य आरोपी प्रबोध राठोडकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचंही पुढे आलंय. विशेष तपास पथक अर्थात एसआयटीनं नांदेड जिल्ह्यातील किनवट कोर्टात दोन आरोपपत्र दाखल केले आहेत.
यात प्रबोध राठोड, नागपूर जिल्ह्यातील काटोल पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सोमनाथ पारवे-पाटील, बळवंत भातलवंडे याला अटक केलीय.
भातलवंडेनं तर तब्बल 25 वेळा डमी उमेदवार बनून परीक्षा दिल्याचं उघड झालंय. त्याच्यामुळे 16 जणांना सरकारी नोकरी मिळाली आहे.