ब्रेकफास्ट न्यूज : नांदेडमध्ये मोबाईलच्या जुन्या बॅटरीचा स्फोट, दोन मुलं गंभीर जखमी
मोबाईलच्या जुन्या बॅटरीसोबत खेळताना स्फोट होऊन दोन मुलं गंभीर जखमी झाली आहेत. नांदेडच्या माहुर शहरात हा प्रकार घडला. सिद्धार्थ भवरे आणि शिवम भवरे अशी या दोन मुलांची नावे आहेत. बॅटरीशी खेळत असताना सिद्धार्थने बॅटरी दगडाने ठेचून चालू केली. पण अचानक बॅटरीचा मोठा स्फोट झाला आणि त्यात सिद्धार्थच्या जबडा अक्षरशः छिन्नविछिन्न झाला. दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.