![ABP News ABP News](https://vodcdn.abplive.com/2018/05/8d41082c29c509965f44e57bc27cc610.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
मुंबई : शनिवार घातवार ठरला, राज्यात तीन आपघातात 25 जणांचा मृत्यू
Continues below advertisement
24 तासात राज्यात वेगवेगळ्या 3 दुर्घटनांमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेड, औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यात या दुर्घटना घडल्या. नांदेड आणि जळगावमध्ये लग्नाहून परतताना वऱ्हाडींना काळानं गाठलं. तर औरंगाबादच्या पैठणमध्ये झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. गेवराई तांडागावाजवळ पाण्याच्या टँकरने रिक्षाला धडक दिली.. यात रिक्षाचालकासह 9 जणांचा मृत्यू झाला.
Continues below advertisement