नांदेड : घराशेजारी कचरा जाळल्याने दोघांमध्ये वाद, संतापलेल्या रहिवाशाचा हवेत गोळीबार

Continues below advertisement
नांदेड शहरातील वर्कशॉप परिसरात काल गोळीबार झाल्याने एकच धावपळ उडाली. घराशेजारी कचरा जाळला म्हणून आसिफ पठाण या व्यक्तीने हा गोळीबार केला. घराच्या बाजुला कचरा जाळण्यात येत असल्याने रागावलेल्या आसिफने घरातून थेट बंदूक आणली. पण नंतर वाद वाढल्यामुळे आसिफने थेट बंदुकीतून गोळी झाडली. सुदैवाने हवेत गोळी झाडल्याने कोणीही जखमी झालं नाही. गोळी झाडल्यानंतर तो घरात जाऊन बसला. मग पोलिसांनी घराच्या खालून त्याची समजूत घातल्यानंतर तो स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला. पोलिसांनी त्याची बंदुक आणि काडतुसं जप्त केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram