नांदेड : नांदेडमध्ये महापालिका निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळणार : मुख्यमंत्री
Continues below advertisement
नांदेडमध्ये शिवसेना ही अशोक चव्हाणांच्या तालावर नाचते, असा घणाघात करत मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी नांदेडमधल्या शिवसेनेचा उल्लेख काँग्रेसची बी टीम असा केला आहे. नांदेड महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेनिमित्त ते बोलत होते. शिवसेनेबरोबरच मुख्यंत्र्यांनी अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली. अशोक चव्हाणांमुळेच नांदेड शहर अधोगतीला केल्याचा आरोप करत काँग्रेसनं फक्त पैशांसाठी सत्ता उपभोगल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी भाजपचा प्रचार करणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप चिखलीकर यांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुकही केलं. 11 तारखेला नांदेड महापालिकेची निवडणूक होणार आहे.
Continues below advertisement