नांदेड : 17 वर्षीय नदाफ एजाज अब्दुलला बाल शौर्य पुरस्कार
Continues below advertisement
नांदेड जिल्ह्यातील एका १७ वर्षीय मुलाला यंदाचा बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. नदाफ एजाज अब्दुल असं या मुलाचं नाव आहे, त्याने मोठ्या धाडसाने एका मुलीचा जीव वाचवला. नदाफ हा नांदेड जिल्ह्यातील पार्डी गावचा रहिवासी आहे. २४ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ३० एप्रिल २०१७ ला दोन मुली तलावात बुडत असताना नदाफने जीवाची पर्वा न करता तलावात उडी घेतली आणि त्या मुलींचा जीव वाचवला. शौर्य पुरस्कारासाठी यंदा १८ जणांची निवड करण्यात आली आहे. त्यात ११ मुलं आणि ७ मुलींचा समावेश आहे.
Continues below advertisement