मुंबई : नाणार प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक शरद पवारांच्या भेटीला
रत्नागिरीच्या नाणार प्रकल्पग्रस्तांनी आज मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतल्या सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली. नाणार प्रकल्प होऊ नये म्हणून हे प्रकल्पग्रस्त आग्रही आहेत. खुद्द शरद पवार आता 10 मे रोजी नाणारच्या प्रकल्पग्रस्तांशी रत्नागिरीत जाऊन चर्चा करणार आहेत. वादग्रस्त नाणार प्रकल्पाला फडणवीस सरकारनं हिरवा कंदील दिल्यानं नाणारवासीय आक्रमक झाले आहेत. नाणारवरुन आता राजकीय वातावरणही तापलं आहे. शिवसेना आणि भाजपत आरोप-प्रत्यारोपांचे नवे अंक सुरु झाले आहेत.