नालासोपाऱ्यात विवाहित महिलेची निर्घृण हत्या, कौटुंबिक वादातून दिराचं कृत्य

Continues below advertisement
नालासोपाऱ्यात एका 26 वर्षीय विवाहित महिलेची कौंटुंबिक वादातून निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. महिलेच्या मोठ्या दिरानेच धारधार हत्याराने ही हत्या केल्याचं उघडकीस आलं. शिवाय ही महिला 2 महिन्यांची गरोदरदेखील असल्याची माहिती मिळते आहे. निखत नदिम असं मृत महिलेचं नाव आहे. दरम्यान आरोपी हत्येनंतर फरार आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असली तरी नेमकं हत्येचं कारण अस्पष्ट आहे. निखतचा मोठा दीर सलमान शेखने सकाळी घरात घुसून निखतवर वार केले. यावेळी शेजारील महिलेने निखतला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात शेजारील महिलादेखील जखमी झाली. ही बाब समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन निखतचा मृतदेह ताब्यात घेतला. 2014 साली निखतचा विवाह झाला होता. तिला एक मुलगीदेखील आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram