नालासोपारा : नेस्लेच्या मॅगीमध्ये अळ्या सापडल्याचा दावा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तुम्ही जर भूक लागल्य़ावर झटपट बनणारी मॅगी सारखी खात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण नालासोपाऱ्यात एका व्यक्तीला मॅगीमध्ये अळ्या आणि किडे आढळले आहेत. नितीन गोवळकर नामक व्यक्तिनं काल डीमार्ट मधून मॅगी विकत आणली. मात्र, घरी मॅगी बनवायला घेतल्यावर त्यात चक्क अळ्या आणि किडे त्यांना आढळून आले आहेत. त्यामुळे तुम्हीही जर असे प्लॅस्टिकबंद खाद्यपदार्थ आणत असाल तर ते खाताना काळजी घ्या.