नालासोपारा : तरुणांमुळे सख्ख्या बहिणींचं गगनभरारीचं स्वप्न साकार
Continues below advertisement
वसईतील दोन गरीब शाळकरी मुलींचं आकाशभ्रमण करण्याचं स्वप्न साकार झालंय. नालासोपाऱ्यातील दोन तरुणांनी केलेल्या मदतीमुळे हे साध्य झालंय. रश्मी सिंग आणि सोनाली सिंग या दोन सख्ख्या बहिणींची परिस्थिती बेताची आहे. त्यांची आई घरकाम करुन दोन्ही मुलींचा सांभाळ करते. या दोन्ही बहिणींनी एकदा विमानप्रवास करण्याची इच्छा होती. ही बाब यश माने आणि कार्तिक कोठारे या दोघांनाही समजली आणि त्यांनी या दोघींना हेलिकॉप्टर सवारी करुन आणली.
Continues below advertisement