मुंबई : नाहूरमध्ये चार महिला चोरांची टोळी गजाआड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकचरा वेचण्याच्या बहाण्याने घरात शिरुन लूटमार करणाऱ्या चार महिलांच्या टोळीला मुलुंड पोलिसांनी जेरबंद केलंय. या सर्व आरोपी चेंबूरच्या अमर महल पुलाखाली राहतात. नाहूर गाव मधील लता पाटील या घराच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावून बाहेर गेल्या होत्या. परंतु काही वेळातच जेव्हा त्या परत आल्या तेव्हा त्यांना या चार महिला त्यांच्या घरातून बाहेर येताना दिसल्या. त्यांनी या चोर असल्याचे ओळखले आणि आरडाओरडा केला. पोलीस खात्यात विशेष विभागात असलेल्या पोलीस शिपाई शिल्पा संतोष गौड या समोर येत होत्या. त्यांनी या चार महिलांपैकी तिघीना पकडले. तर चौथ्या महिलेला पोलिसांनी गोरेगाव भांडुप लिंक रोड वरून अटक केली. कचरा वेचण्याचा बहाण्याने ही महिलांची टोळी फिरत आणि एखाद्या घरातील माणसं बाहेर गेलेली पाहून चोरी करण्याची त्यांची पद्धत होती.