नागपूर : 22 वर्षीय तरुणाचा खून, पाच दिवसात पाचवी हत्या
नागपुरात हत्यांचे सत्र काही थांबताना दिसत नाही. कारण नागपुरात गेल्या पाच दिवसांत पाच हत्या झाल्या आहेत. आज इथल्या गोंडखैरी गावातल्या जिल्हा परिषद शाळेत 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. नंदू भोसले असं या तरुणाचं नाव आहे. पूर्व वैमनस्यातून त्याची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.