नागपूर : महिला आणि मुलीला घरात घुसून गुंडांची मारहाण, सामानाचीही तोडफोड
Continues below advertisement
राज्याची उपराजधानी नागपुरात गुंडांना पोलिसांची भिती उरलीये की नाही, असा प्रश्न आता पडतोय. कारण गुंडांच्या टोळीने एका महिलेला घरात घुसून मारहाण केली आणि घरातील साहित्य फेकून दिल्याची घटना गजानन नगरमध्ये घडलीय.
प्रभा नेताम या त्यांच्या २ मुलींसोबत जेवत असताना घरात काही गुंड घुसले आणि त्यांनी घर खाली करण्यासाठी या महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. इतकच नाही तर मुलींनाही मारहाण करत साहित्याचीही तोडफोड केली. पतीच्या निधनानंतर त्यांचे काही नातेवाईक घर बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांनीच गुंड पाठवून धमकावल्याचा आरोप पीडित महिलेने केलाय. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, गुंडांचा शोध घेतला जात आहे.