नागपूर : जो सरकार निकम्मी, वो सरकार बदलनी है, विरोधकांची घोषणाबाजी
आघाडी सरकारने 15 वर्षात काय केलं, त्याऐवजी तुम्ही मागच्या तीन वर्षात काय केलं. याचा हिशेब द्या, असं प्रश्न अजित पवारांनी सरकारला केला आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशन सुरु होण्याआधीच कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांवरुन विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी घोषणा दिल्या. कर्जमाफीबाबत बँकेत शहानिशा केल्यावर शेतकऱ्यांची फक्त नावं आली आहेत. मात्र अजूनही पैसे जमा झालेले नाहीत, असं सांगण्यात आल्याचा दावाही यावेळी अजित पवारांनी केला आहे.