नागपूर : कलिंगडला भाव नाही म्हणून यवतमाळच्या बीटेक, एलएलबी शिकलेल्या शेतकऱ्यांची वणवण
Continues below advertisement
बळी तो कान पिळी ही म्हण आपल्याकडे चांगलीच परिचित आहे. म्हणजे कुणी नेता, अधिकारी किंवा वजनदार माणूस असेल तर त्याला कायद्याची भीती दाखवताना पोलीसही घाबरतात. पण नागपुरात रक्ताचं पाणी करुन पिकवलेला माल विकण्यासाठी एक तरुण 12 दिवस झाले वणवण फिरतोय. ऋषीकेश गुघाणे, वीरेश्वर गुघाणे आणि त्यांचे काका चैतन्य गुघाणे यांच्यावर ही वेळ आणलीय नागपूर पोलिसांनी. ते मूळचे यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील कुऱ्हा गावचे आहेत. 2 एकरात त्यांनी 50 टन कलिंगड पिकवले. यवतमाळ बाजार समितीत त्याला कवडीमोल भाव होता. म्हणून टेम्पोत भरुन माल नागपूरला आणला. तर इथं कुणी रस्त्यावर माल विकू देईना. पोलीस हटकू लागले. या सगळ्या खेळात 5 टन कलिंगड खराब झाले. ऋषीकेशनं बीटेक अॅग्रीकल्चरचं शिक्षण घेतलंय. तर वीरेश्वर एलएलबी करत आहे.
Continues below advertisement