नागपूर : नागपुरात मुसळधार, शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं

Continues below advertisement
मुसळधार पावसामुळे नागपुरचं जनजीवन विस्कळीत झालंय. विशेष म्हणजे कधी नव्हे ते विधानभवनातही पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं.. त्यामुळे विधीमंडळातली बत्ती काही काळ गुल झाली होती.. परिणामी विधीमंडळाचं आजचं कामकाज रद्द करण्यात आलं. आता थेट सोमवारी विधीमंडळाचं कामकाज होणार आहे.
तर आकडेवारी पाहता नागपुरात 24 तासात 61.7 मिमी पाऊस झालाय... तर गेल्या तीन तासात तब्बल 162.7 मिमी एवढ्या पावसाची नोंद झालीय... तर येत्या 24 तासांत हवामान विभागानं नागपुरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे,...
दरम्यान, सकाळपासून झालेल्या पावसामुळे नागपूर शहरातील अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे.
नागपूर विमानतळावरही पाणी साचलं आहे. विमानतळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram