नागपूर : भाजपच्या महामेळाव्यासाठीची ट्रेन कार्यकर्त्यांना न घेताच मुंबईकडे रवाना
Continues below advertisement
उद्या बीकेसीत होणाऱ्या भाजपच्या महामेळाव्यासाठी नागपूरहून एका विशेष रेल्वेची सुविधा करण्यात आली होती. मात्र ही रेल्वे वेळेच्या जरा जास्तच आधी निघाल्यानं भाजप कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या विशेष ट्रेनची वेळ सकाळी साडे दहा वाजता सांगण्यात आली होती. मात्र सकाळी 9 वाजता जेव्हा कार्यकर्ते रेल्वे स्टेशनवर दाखल झाले, तेव्हा ती ट्रेन सकाळी 7 वाजताच रवाना झाल्याची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली.
Continues below advertisement