नागपूर : नागपुरातील आमदार निवासात मृतदेह आढळला

Continues below advertisement

आमदार निवासात एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची घटना नागपुरात घडली आहे. विनोद अग्रवाल (वय 50 वर्षे) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मुंबईतील अंधेरी पूर्वचे शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या नावावर ही रुम आहे.

दुसऱ्या क्रमांकाच्या विंगमधील 46 क्रमांकाच्या रुममध्ये विनोद अग्रवाल यांचा मृतदेह आढळला. सकाळी बराच वेळ दार वाजवूनही विनोद अग्रवाल यांनी रुमचा दरवाजा उघडला नाही. त्यानंतर लॉक तोडून आत प्रवेश केल्यानंतर ही घटना लक्षात आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram