नागपूर : विधानसभेत अरबी समुद्रातील शिवरायांच्या पुतळ्याच्या उंचीवरुन राडा
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्या उंचीवरुन विधानसभेत गदारोळ माजला. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा आरोप केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी केवळ राजकारण करणार असाल तर गोंधळ करा अन्यथा माझं उत्तर ऐका असं प्रत्युत्तर दिलं. शिवाय विरोधकांकडून वारंवार काही छोट्या तांत्रिक चुका काढून छत्रपतींचा अपमान केला जातोय, असं टीकास्त्रही त्यांनी विरोधकांवर सोडलं. त्यामुळे विरोधकांनी वेलमध्ये उतरून जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा लगावल्या. तर सत्ताधाऱ्यांनीही वेलमध्ये उतरुन घोषणा दिल्या.