नागपूर : 'भलत्या' शब्दावरुन गोंधळ, अतुल भातखळकरांच्या निलंबनाची मागणी
शिवस्मारकाच्या उंचीवरुन वाद सुरु असताना 'भलत्या' शब्दावरुन विधानसभेत जोरदार गोंधळ झाला. भाजपचे आमदार अतुल भातखळकरांनी शिवस्मारकाच्या विषयावर बोलताना 'भलत्या विषयावरुन' या शब्दाचा वापर केला. त्यानंतर विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले. आमदार अतुल भातखळकर यांना तातडीने निलंबित करा, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली. त्यामुळे या मुद्द्यावरुन तब्बल तीनवेळा विधानसभेचं कामकाज तहकूब झालं.