नागपूर : खड्ड्यांच्या वक्तव्याबद्दल चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी
Continues below advertisement
कल्याणमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळं ज्या पाच जणांचे बळी गेले त्याच रस्त्यावरुन पाच लाख लोकांनीही प्रवास केला असं अजब वक्तव्य केल्याप्रकरणी, चंद्रकांत पाटलांनी विधान परिषेदत माफी मागितली. दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पडलेल्या खड्ड्यांची जबाबदारी इतरांवर ढकलण्याचा प्रयत्न केलाय. रस्त्यांसाठीचा सर्वच दोष शासनावर टाकता येणार नाही असं म्हणत त्यांनी सर्व जबाबदारी मुंबई महापालिकेवर ढकलण्याचा प्रयत्न केला
Continues below advertisement