नागपूर : पावसामुळे बत्ती गुल, अंधारात विरोधकांसह शिवसेनेचं आंदोलन
Continues below advertisement
नागपूरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्याचा फटका विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही बसला आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळात वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्याने विधीमंडळाचं कामकाज स्थगित झालं आहे. इतकंच नाही तर मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर गुडघाभर पाणी साचलं आहे. पावसामुळे नागपुरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुंबईसारखीच परिस्थिती नागपूरमध्ये घडली आहे. विरोधकांसह शिवसेनेनेही अंधारातच आंदोलन केलं.
Continues below advertisement