नागपूर : पावसामुळे विधीमंडळात अंधार, सरकारच्या हट्टीपणामुळे ही परिस्थिती : अजित पवार
नागपूरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्याचा फटका विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही बसला आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळात वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्याने विधीमंडळाचं कामकाज स्थगित झालं आहे. इतकंच नाही तर मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर गुडघाभर पाणी साचलं आहे
या सरकारच्या हट्टीपणामुळे ही परिस्थिती आली आहे. आज आम्ही सकाळपासून विधीमंडळात आहे. कुठेही लाईट नाही. लॉबीमध्ये अंधार झाला आहे. इथं अधिवेशन घेत असताना, जी पूर्वतयारी करायला हवी, जी काळजी घ्यायला हवी, ती घेतलेली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी केला.