
नागपूर : वैद्यकीय प्रवेशाच्या आरक्षणावरुन विधानपरिषदेत मोठा गदारोळ
Continues below advertisement
मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि कोकणामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केलीय. ते आज विधानपरिषदेत बोलत होते. राज्यात वैद्यकीय प्रवेशाच्या आरक्षणावरुन आज विधानपरिषदेत मोठा गदारोळ झालाय. महाराष्ट्रात वैद्यकीय प्रवेशाबाबत ७०-३० टक्के कोटा राबविल्या जात असल्याने मराठवाडा, विदर्भातील मुलांवर अन्या होतोय. कारण मराठवाड्यात वैद्यकीय प्रवेशाच्या कमी जागा आहेत. त्या तुलनेत विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रात जास्त महाविद्यालयं आहेत. त्यामुळे त्यांच्या वाट्याला जास्त जागा येतात. यावरुन आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि सत्ताधारी भाजपमध्ये जुंपलीय. यावेळी गिरीश महाजन यांना वेलमध्ये उतरावं लागलं.
Continues below advertisement