नागपूर : सिंचन प्रकल्पासाठी केंद्राचा भरघोस निधी, विदर्भाला झुकतं माप
Continues below advertisement
राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. विविध सिंचन प्रकल्पांसाठी राज्याला १ लाख १५ हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केलीय. केंद्राकडून बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत ही मदत दिली जाणार आहे. या योजनेसाठी पंतप्रधान मोदींनी आऊट ऑफ द वे जात निर्णय घेतल्याचंही गडकरी म्हणाले. या योजनेच्या माध्यमातून तब्बल ३ लाख ७७ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून, राज्यातील सिंचनक्षमता १८ टक्क्यांवरुन थेट ४० टक्क्यांवर जाणार आहे. या माध्यमातून अनेक अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण होणार आहेत. या योजनेत विदर्भातील ६६ तर मराठवाड्यातील १७ प्रकल्पांचा समावेश आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यातील प्रकल्पांचाही समावेश करण्यात आल्याचंही गडकरी म्हणाले.
Continues below advertisement