नागपूर : पारंपरिक पोषाखात नागपूर मेट्रोमध्ये महिलांची वटपौर्णिमा साजरी
नागपूरात खास आजच्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष जॉय़ राईडचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये वरुणराजाने एन्ट्री घेतल्यानंतरही महिलांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. अनेक जणी फेटे बांधून सजून आल्या होत्या. मेट्रो राईडचा या महिलांनी पारंपरिक वेशभूषेत आनंद घेतला. दागिने घालून, जरीकाठाच्या साड्या घालून महिलांनी इथे उपस्थिती लावली होती. तर काही जणींनी खास ऑफिसमधून वेळ काढत शहराच्या विकासातील हा महत्त्वाचा टप्पा पाहिला.