नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे

Continues below advertisement
वबळावर निवडणुका ही शक्यता नाही तर निर्धार आहे अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला खुलं आव्हान दिलंय..तसंच भाजपनं पालघरमध्ये माघार घेतल्यास भंडारा-गोंदियात त्यांना समर्थन देऊ अशी घोषणाही त्यांनी केली.. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपशी दोन हात करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कंबर कसलीय. आज सकाळपासून उद्धव ठाकरे ऐतिहासिक विदर्भ दौऱ्यावर आहेत..भाजपचा गड असलेल्या विदर्भात उद्धव ठाकरेंनी पक्षबांधणीचा मोठा कार्यक्रम हाती घेतलाय..विशेष म्हणजे आजवर कुठल्याच ठाकरेंनी एवढ्या संघटनात्मक बैठका विदर्भात घेतल्या नव्हत्या..नागपूरच्या रवीभवन मध्ये त्यांनी लोकसभा क्षेत्र निहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.....
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram